पुण्यात भाजपची खेळी ; बालेकिल्ल्यातच अजित पवारांची डोकेदुखी वाढणार?


पुणे : आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकांमध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात भाजपने मोठी खेळी खेळली आहे.. अजित पवार यांची पुण्यात ताकद असताना आता पुणे महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याची तयारी आखत असल्याने अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्यावर ठाम आहे. त्यामुळे ही निवडणूक जास्त चुरशीची होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पक्षाची राज्यात युती आहे. मात्र पुण्यात भाजप स्वबळावर लढणार असल्याने महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महापालिका निवडणुकीत भाजपकडून 32 प्रभागांत 128 उमेदवार रिंगणात उतरवले जाणार असून, पक्ष संघटनात्मक ताकदीच्या जोरावर स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहे”, अशी माहिती शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिली आहे. त्यामुळे त्या आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यात बाजी कोण मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान याआधीच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ९८ जागा जिंकून सत्ता मिळवली होती. यंदाही सर्वच जागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. महापालिका निवडणुका महायुतीसोबत लढायच्या की स्वतंत्रपणे, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. मात्र शहरात आमचे संघटन मजबूत आहे आणि स्वबळावर लढण्यास आम्ही तयार आहोत”, असं शत्रुघ्न काटे म्हणाले आहेत. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवली तर अजित पवार यांना मोठा धक्का बसणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!