जिल्ह्यात राष्ट्रवादीला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न!
भाजपचे बडे नेते जिल्हा नियोजन समितीवर...!

पुणे : पुणे जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित तसेच विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे तसेच बाळासाहेबांची शिवसेना गटाशी संलग्न असलेल्या शिवसेनेच्या आजी माजी आमदार,जिल्हा परिषद सदस्य तसेच पदाधिकारी यांना या समितीवर नियुक्त करण्यात आले आहे.
बाळा भेगडे, योगेश टिळेकर या माजी आमदारांचा तसेच प्रविण काळभोर, वासुदेव काळे, आशा बुचके, गणेश बिडकर यांचा समिती सदस्यांत समावेश आहे.
विधी मंडळातून भिमराव धोंडिबा तापकीर,
( धनकवडी, ता. हवेली) राहुल सुभाष कुल (राहु, ता. दौंड) यांची नियुक्ती झाली.
जिल्हा नियोजनाचे पूर्वी ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य शिवाजीराव आढळराव पाटील (लांडेवाडी, पो. घोडेगाव, ता. आंबेगांव) हर्षवर्धनजी शहाजी पाटील
(मु.बावडा, ता. इंदापूर) गणेश मधुकर बिडकर (सोमवार पेठ) विजय सोपान शिवतरे (सोपाननगर, सासवड, ता. पुरंदर) हे आहेत.
जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले विशेष निमंत्रित सदस्य पुढील प्रमाणे : भगवान नारायण पोखरकर ( वराळे, ता. खेड) संजय (बाळा) विश्वनाथराव भेगडे ( तळेगाव दाभाडे, ता. मावळ) वासुदेव शंकरराव काळे ( शिवकुंज संस्कारनगरी, दौंड) आशा दत्तात्रय बुचके (पारुंडे, ता. जुन्नर) राहुल बाबुराव पाचर्णे( बाबुरावनगर, ता. शिरूर) जीवन पांडुरंग कोंडे(केळवडे, ता. भोर) पांडुरंग मारुती कचरे (काटेवाडी, ता. बारामती) विजय विष्णु फुगे (भोसरी, ता.हवेली) काळुराम आनंदा नढे (काळेवाडी) प्रविण उत्तमराव काळभोर (कदमवाकवस्ती, हवेली) योगेश टिळेकर( लक्ष्मी निवास, कोंढवा बु) शरद गणपत हुलावळे (कार्ला, ता. मावळ) अलंकार बाळासाहेब कांचन (मु.पो. ऊरुळीकांचन) अमोल बाळासाहेब पांगारे(वेळू, भोर)