भाजपला खिंडार ; 2 माजी जिल्हाध्यक्षांसह 8 माजी नगरसेवकाचा शिंदे गटात पक्षप्रवेश

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारी लागले आहेत. या निवडणुकीच्या तोंडावरच आता शिवसेना शिंदे गटांन भाजपला मोठा दणका दिला आहे.उल्हासनगरमध्ये भाजपच्या दोन माजी जिल्हाध्यक्षांसह आठ माजी नगरसेवकांना शिंदे गटानं आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उल्हासनगरमध्ये भाजपच्या दोन माजी जिल्हाध्यक्षांसह आठ माजी नगरसेवकांना शिंदे गटानं आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.यामुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली असून, महापालिका निवडणुकीत हा भाजपासाठी मोठा आघात ठरू शकतो.खरं तर, महापालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत. मात्र उल्हासनगरमध्ये आतापासूनच महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत. तसतसं शहरात शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष देखील वाढू लागला आहे. त्यामुळे एकमेकांचे माजी नगरसेवक फोडण्याचे राजकारण सुरू झाले आहे. अशात शिवसेना शिंदे गटाने भाजपला खिंडार पाडलं आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाचे महत्त्वाचे नेते पदाधिकारी फोडून स्वत:च्या पक्षाची ताकद वाढवली जात आहे. आता महायुतीतच संघर्ष वाढला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून एकमेकांचे नेते- पदाधिकारी फोडण्याचं काम सुरू आहे.
