BJP : ब्रेकिंग! भाजपा २० खासदारांना बजावणार नोटीस, महत्वाचं कारण आलं समोर…


BJP : गेल्या जवळपास वर्षभरापासून देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा सुरु आहे. देशभरात एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याच्या या विधेयकाबाबत मतमतांतरे आहेत. मात्र, आज हे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं.

यावेळी विधेयकावर विरोधी इंडिया आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. विरोधकांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. त्यानंतर सभागृहात काहीवेळ गोंधळ देखील पाहायला मिळाला.

मात्र, तरीही ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे विधेयक सादर करण्यात आले आहे. या विधेयकावर लोकसभेत मतदान घेण्यात आले. यावेळी विधेयकाच्या बाजूने २६९ सदस्यांनी तर १९८ जणांनी विरोधात मतदान केले. मात्र, ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सर्व खासदारांना व्हीप जारी करत सर्व खासदारांना सभागृहात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

मात्र, तरीही भाजपाचे तब्बल २० खासदार गैरहजर राहिले. त्यामुळे भाजपाकडून या २० खासदारांना आता नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नोटीसच्या माध्यमातून अनुपस्थित राहण्याचं कारण विचारले जाणार आहे, या खासदारांनाही सभागृहात गैरहजर राहण्यामागाचं कारण आता पक्षाला सांगावं लागणार आहे.

भाजपाने व्हीप बाजावून देखील लोकसभेत आज गैरहजर राहिल्यामुळे भाजपाकडून नोटीस पाठवली जाणार आहे. मात्र, यामध्ये कोणते २० खासदार आहेत? याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. तसेच हे २० खासदार गैरहजर का राहिले? याचं कारण आता त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरच समोर येणार आहे. त्यामुळे या खासदारांवर पक्षाकडून काही कारवाई केली जाते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. .

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!