भाजपचा संकल्प जाहिरनामा ! शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव ; २५ लाख रोजगार निर्मिती , लाडकी बहीणीला २१०० रुपये दरमहा ….


मुंबई : मुंबईत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी महाराष्ट्र निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपने या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव दिले आहे. भाजपने आपल्या संकल्पपत्रात महत्त्वाची आश्नासने दिली आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

 

यावेळी भाजपच्या जाहीरनाम्यात अनेक विषयासंदर्भात घोषणा करण्यात आल्या. त्यात आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. आम्ही भावांतर योजना आणणार आहोत. जिथे हमी भावाने खरेदी होणार नाही, तिथे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना फायदा देऊ. हे मागच्यावर्षी करून दाखवलं, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले.

 

जो संकल्प करतोय, तो महाराष्ट्राच्या प्रगतीचा विकासाचा आणि छत्रपतींच्या रयतेचा आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली राज्याची वेगाने वाढ होत आहे. राज्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढत आहे. महाविकास आघाडीच्या काळात दरडोई उत्पन्न सहा हजार रुपयांनी कमी झाले होते, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

 

वाचा काय आहेत घोषणा...

-शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार

-लाडकी बहिण योजनेत 2100 रुपये

-शेतकऱ्यांची कर्जमाफी भावांतर योजना

-एरोनॉटिक्स आणि स्पेसमध्ये उत्पादनाची संधी

-शेतकऱ्यांसाठी मूल्यसाखळी बनवण्याचा प्रयत्न

-2027 पर्यंत 50 लाख लखपती दीदी तयार करण्याचा प्रयत्न

-महारथी मार्फत मोठ्या लॅब तयार करण्याचा प्रयत्न करणार

-महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करणार

-15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रयत्न असेल

-युवामध्ये फिटनेस असली पाहिजे, त्यासाठी स्वामी विवेकानंद फिटनेस कार्ड तयार करणार आहोत

-गडकिल्ल्यांसाठी प्राधिकरण तयार करणार आहोत

-ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा धोरण करणार आहोत

-प्रत्येक गरीबाला अन्ननिवाऱ्याचे नियोजन

-वृद्ध पेन्शन योजनेत दीड हजार वरुन आता 2100 रुपये करणार

-25 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य

-विद्या वेतनाच्या माध्यमातून आम्ही अग्रेसर असणार

-10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार

-गरीब मध्यम वर्गीयांना सौर आणि अक्षय योजनेतून वीज बिलातून कमी करण्याचा प्रयत्न करणार

-फिनटेक आणि एआयमध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती होणार आणि त्यांचे केंद्र महाराष्ट्र असेल

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!