राजकारणातील सर्वात मोठी बातमी! भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर..


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. असे असताना आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना एक मोठी ऑफर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समितीने अनेकांना पक्षात येण्याच्या ऑफर दिल्या आहेत.

आता बीआरएसने भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे.
बीआरएसचे राज्य समन्वयक बाळासाहेब सानप यांनी पंकजा मुंडे आमच्या पक्षात आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे म्हटले आहे.

तसेच पंकजा बीआरएसमध्ये आल्यास त्यांची मुख्यमंत्री पदाची त्यांची इच्छा पूर्ण होईल का? असे विचारता त्यावर सानप यांनी नक्कीच त्यांना न्याय मिळेल, असे सांगितले. यामुळे चर्चांना वेग आला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत या विषयांवर चर्चा करू. ते कोणत्याही जातीचे समीकरण न करता, जो सक्षम नेता आहे त्याला ताकद दिल्याशिवाय राहत नाहीत. पंकजा मुंडे यांना बीआरएसमध्ये शंभर टक्के न्याय मिळेल, असे ते म्हणाले.

दरम्यान, आषाढी वारीचे औचित्य साधून मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेतृत्वात 27 जून रोजी तेलंगणाचे संपूर्ण मंत्रिमंडळ पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी येणार आहेत. यावेळी ते शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!