BJP : भाजपची चौथी यादी जाहीर, अखेरच्या टप्प्यात किती उमेदवारांना संधी?

BJP : महायुतीमध्ये अजूनही काही जागांवरील तिढा सुटलेला नाही. मात्र ज्या जागांवर योग्य तोडगा निघतोय, त्या-त्या जागांचे उमेदवार महायुतीकडून जाहीर केले जात आहेत. नुकतेच भाजपाने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण दोन जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत.
भाजपने उमरेड आणि मीरा-भाईंदर मतदारसंघातून तिकीट मिळवलेल्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. उमरेड मतदार संघातून सुधीर पारवे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर, मीरा- भाईंदर मतदारसंघातून नरेंद्र मेहता यांना संधी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची एकामागून एक यादी जाहीर करताना दिसत आहे. नुकतीच भाजपने आपल्या दोन उमेदवारांची यादी जाहीर केली. BJP
भाजपने उमरेड विधानसभा मतदारसंघातून सुधीर पारवे आणि मीरा- भाईंदर मतदारसंघातून नरेंद्र मेहता यांना संधी दिली. भाजपने आतापर्यंत १५० हून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने आपल्या पहिल्याच यादीत ९९ उमेदवारांची नावे घोषित केली आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा महायुतीतील भाजप या पक्षाकडून तब्बल 99 उमेदवारांची यादी जाहीर कऱण्यात आली होती. यामध्ये देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह चंद्रशेखर बानवकुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये २२ उमेदवार, तिसऱ्या यादीमध्ये आणखी २५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.