शस्त्रसंधीनंतर देशातील 32 विमानतळांबाबत केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, जाणून घ्या..


नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील 32 विमानतळांची नागरी वाहतूक सेवा 15 मे 2025 च्या सकाळी साडेपाच वाजेपर्यंत तात्पपुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले होते. याबाबत तेथील सुरक्षा देखील तेवढीच महत्वाची होती.

आता परिस्थिती निवळली आहे. ती पूर्वपदावर येत असल्याने केंद्र सरकारने 32 विमानतळांवरची नागरी वाहतूक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विमानतळे आता तात्काळ प्रभावाने नागरी विमान सेवांसाठी उपलब्ध आहेत, असे सांगण्यात आले आहे. प्रवाशांना एअरलाइन्सशी थेट फ्लाइटची स्थिती तपासण्याची आणि नियमित अपडेटसाठी एअरलाइनच्या वेबसाइटचे निरीक्षण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

यामध्ये पठाणकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोट (हिरासर), सरसावा, शिमला, थॉइस, उत्तरलाई, चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, जैसलमेर, जामनगर, जोधपूर अधमपूर, अंबाला, अवंतीपूर, भटिंडा, भुज, बिकानेर, हलवारा, हिंडन, जम्मू, कांडला, कांगडा (गग्गल), केशोद, किशनगड, कुल्लू मनाली (भुंतर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नाल्या या विमानतळाचा समावेश आहे.

तसेच जैसलमेर, जामनगर, जोधपूर, अधमपूर, अंबाला, अवंतीपूर, भटिंडा, भुज, बिकानेर, हलवारा, हिंडन, जम्मू या देखील विमानतळाचा समावेश आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर देशातील 32 विमानतळ काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

पाकिस्तानकडून सलग तीन दिवस रात्रीच्या वेळी ड्रोन हल्ले करण्यात आले. तसेच सीमाभागात अनेक ठिकाणी गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने चोख उत्तर दिलं. भारताने पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ला केला. भारतीय वायुसेनेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या एअरबेसचं मोठं नुकसान झालं.

यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. पाकिस्तानने भारतीय एअरबेसवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. यावेळी सुरक्षेसाठी विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. यामुळे याबाबत आता सरकारने निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!