पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर सर्वात मोठा निर्णय, आता स्वारगेट बस स्थानकात…


पुणे : स्वारगेट आगारात झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. राज्यात आणि पुण्यातही कायदा सुव्यवस्थेचे वातावरण आहे की नाही, गुन्हेगारांना वचक कधी बसणार? असे प्रश्न विरोधकांकडून तसेच जनेतकडूनही विचारला जात आहेत.

स्वारगेट अत्याचार प्रकरणातनंतर आता एक मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. बलात्काराच्या घटनेनंतर येथील सुरक्षेचा मुद्दा एरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वारगेट एसटी प्रशासनाकडून 36 सुरक्षारक्षकांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये महिला सुरक्षारक्षक देखील असणार आहेत, असे एसटी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

सुरक्षित प्रवासासाठी एसटीला प्राधान्य देण्यात येते. सवलतीमुळे सध्या महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. परंतु घडलेल्या घटनेनंतर एसटी बसस्थानकात सुरक्षेची कमतरता असल्याचे दिसून आले. याला एसटी प्रशासनाला जबाबदार धरण्यात आले आहे. अनेकांचे विलंबन देखील करण्यात आले आहे.

त्यामुळे बसस्थानक आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बलात्कार, विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सराईतांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पुन्हा चौकशी केली जाणार आहे.

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या, तसेच बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईतांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी करावी, असे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!