माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा! कोकाटेंच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली…

नाशिक : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. न्यायलयाच्या या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरील संकट टळले आहे. नाशिकच्या न्यायलयाने माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी दोषी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी कोर्टात या निकालाला आव्हान दिले.

मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे देऊन लाटण्याच्या प्रकरणात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.
कृषिमंत्री कोकाटे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नर विधानसभेचे आमदार आहेत. कोर्टाने ३० वर्ष जुन्या प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेमुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपदच नव्हे तर आमदारकीही धोक्यात आली होती.

विरोधकांनी देखील विधानसभा अध्यक्षांकडे तातडीने कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, आपल्याकडे योग्य पद्धतीने निकाल आला नसल्याने कार्यवाही करता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले.
न्यायलयाच्या या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरील संकट टळले आहे. नाशिकच्या न्यायलयाने माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी दोषी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी कोर्टात या निकालाला आव्हान दिले.
मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे देऊन लाटण्याच्या प्रकरणात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.
कृषिमंत्री कोकाटे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नर विधानसभेचे आमदार आहेत. कोर्टाने 30 वर्ष जुन्या प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेमुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपदच नव्हे तर आमदारकीही धोक्यात आली होती.
विरोधकांनी देखील विधानसभा अध्यक्षांकडे तातडीने कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, आपल्याकडे योग्य पद्धतीने निकाल आला नसल्याने कार्यवाही करता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.