शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ७५८ कोटींच्या दूध अनुदानाला अखेर मंजुरी, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. याचे कारण म्हणजे दुधाचे दर कमी झाले असून उत्पादन खर्च देखील निघत नाही. यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. असे असताना राज्य सरकारने दुधाला अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये काही महिन्यांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले होते.
असे असताना मात्र काही महिन्यांचे अनुदान रखडले होते. आता रखडलेले अनुदान देखील सरकारने मंजूर केले असून 758 रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत. यामुळे राहिलेले अनुदान देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबत निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील दूध उत्पादकांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अनुदान देण्यात आले आहे.
आता पुढील तीन महिन्यांचे पाच रुपये अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अद्याप निधी प्राप्त झाला नसून तो वर्ग झाल्यानंतर वाटप होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच याबाबत पैसे मिळतील. याबाबतची माहिती दुग्ध व्यवसाय आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली आहे.
दरम्यान, सध्या पशुधन सांभाळण्यासाठी खर्च वाढत असून म्हैस आणि गायीच्या दुधाला अपेक्षित दर मिळताना दिसत नाही. यामुळे दुग्ध उत्पादक अडचणीत आले आहेत. यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. तसेच सतत पडणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन उभारले होते.
त्यावेळी या प्रश्नावरून विधानसभेत देखील विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना घेरलं होते. यामुळे याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच याचे पैसे वर्ग करण्यात येतील. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी मागणी करत होते.