मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडे देणार राजीनामा? म्हणाले, माझ्या राजीनाम्याचा निर्णय….


बीड : येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हा प्रकरणी विरोधकांच्या निशाण्यावर असलेले राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

याबाबत आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आले. नंतर माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, अद्याप माझ्या राजीनाम्याची मागणी कोणीही केली नाही. संतोष देशमुख प्रकरणात मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाही, मी द्वितीय दर्शनी दोषी आहे की नाही, मी राजीनामा द्यावा की नाही हे सगळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ठरवणार.

तसेच ते म्हणाले, अंजली दमानिया या अजितदादांना भेटल्या. यावेळी त्यांनी काही कागदपत्रे दाखवली. काही पुरावे दाखवलेत त्यावर अजित दादा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट उत्तर देतील अशी माझी अपेक्षा आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मुंडेंविरोधात पुरावे दाखवले. मंत्री धनंजय मुंडे हे आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी चर्चा होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!