मोठी बातमी! महाराष्ट्रात ‘या ‘चार दिवशी ड्राय डे असणार ; तळीरामांचा घसा कोरडा राहणार

पुणे : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणूक काळात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सरकारकडून 13 ते 16 जानेवारी 2026 दरम्यान ड्राय डे लागू करण्यात आला आहे. नियम तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सुरू असलेला प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महसूल विभागाने निवडणूक आयोगाने एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे.
13 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत राज्यातील सर्व दारूचे दुकाने, बार परमिट रूम आणि वाईन शॉप बंद राहणार आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास ही सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन करण्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान या नियमाचा प्रभाव महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका क्षेत्रात राहील, ज्यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या प्रमुख महानगरपालिका समाविष्ट आहेत.अशा प्रकारे १३ जानेवारीपासून १६ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये चार दिवसांचा ड्राय डे लागू असेल, ज्यामुळे मतदानाची प्रक्रिया सुरक्षित, शांत आणि पारदर्शक होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.