मोठी बातमी! धनंजय मुंडे प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनियांची चौकशी होणार..

मुंबई : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक धक्कादायक आरोप केले होते. असे असताना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची देखील धनंजय मुंडे प्रकरणात चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंजली दमालिया यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पत्र पाठवलं आहे. धनंजय मुंडे राज्याचे कृषिमंत्रीअसताना त्यांनी 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. अंजली दमानिया यांनी या प्रकरणात पुरावे सादर करणार असं देखील म्हणाल्या होत्या.
यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने ही चौकशी करण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. अंजली दमानिया यांनी लाचलुचपत विभागाला पत्र लिहून तक्रार दिली होती. त्यामुळे आता या आरोपांप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात अंजली दमानिया यांना पत्र पाठवण्यात आला आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लाचपुत विभागाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, जर अंजली दमानिया चौकशीसाठी हजर राहिल्या नाही तर त्यांचे या प्रकरणात काहीही म्हणणं नाही असे समजून हा अर्ज दप्तरी दाखल करण्यात येणार आहे. आता या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे न्यायालयात याचिकाच दाखल झालेल्या नाही.
तर कृषी उद्योग विकास महामंडळाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनीही या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक धक्कादायक आरोप केले होते.