मोठी बातमी! शरद पवार अखेर मैदानात, मनोज जरांगेच्या भेटीला जाणार?

पुणे : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहे.ओबीसीतून आरक्षणा मिळाल्याशिवाय माघार नाही, अशी आझाद भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. आंदोलन सुरू होताच विरोधी गोटातील नेत्यांची जरांगेंच्या उपोषस्थळी रीघ लागली आहे. सरकारचा कोणताही मंत्री भेटायला जाण्यापूर्वी आता ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणून जरांगे यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहेत. काल रात्री त्यांची तब्येत खालावली. शरद पवार गटाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. शनिवारी रात्री या घडामोडी घडल्या. राजेश टोपे आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली. शरद पवार यांचा निरोप घेऊन टोपे आले होते अशी चर्चा उपोषण स्थळी रंगली. त्यामुळे आता शरद पवार जरांगेची भेट घेणार आहेत. ही भेट जर झाली तर सरकारवर आपोआपच मोठा दबाव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान भाजपच्या गोटातून भेटीऐवजी म्हणून जरांगे यांच्या आंदोलनावर हल्लाबोल झाला. अशातच आता शरद पवार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली तर सरकार विषयी जनमतावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मुंबई हे आता मराठ्यांचे आंदोलन केंद्र ठरले आहे. आतापर्यंत अंतरवाली सराटी आणि वाशी या ठिकाणी मराठा आंदोलन झाली.सरकारला वेळोवेळी वेळ देऊन सुद्धा मराठा आरक्षणाविषयीची निराशा हाती लागली आहे. कुणबी प्रमाणपत्र वाटप होत असले तरी त्याची पडताळणी होऊन तो पुरावा पक्का होत नाही, तोपर्यंत या प्रमाणपत्रांना कागदासारखी किंमत आहे. त्यामुळे मराठा समाज इरेला पेटला आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असा निर्धारच मराठा समाजाने केला आहे.
