मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांचा नवा बॉम्ब; मुरलीधर मोहोळांकडे इनोव्हा कार कोणाची? आरोपाने खळबळ…

पुणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मागील काही दिवसांपासून भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात आरोपांचा राळ उठवली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपाने खळबळ उडाली आहे.मोहोळ हे पुण्याचे महापौर असताना ते वापरत असलेली इनोव्हा कार ही एका बिल्डरची होती, असा दावा धंगेकरांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

मुरलीधऱ मोहोळांवर आरोप करताना रवींद्र धंगेकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, “पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन होस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसात पाहिले आहेत. परंतु तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग असलेले सांगतात. मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो. मोहोळ हे खासदार होण्याच्या अगोदर पुण्यनगरीचे महापौर होते. हे महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरायचे. त्या गाडीचा नंबर होता MH 12 SW 0909. ही गाडी ना मोहोळ यांची होती ना पुणे महानगरपालिकेचे शासकीय वाहन. ही गाडी होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची. हे तेच बिल्डर आहे ज्यांनी जैन होस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर आहेत,” असा हल्लाबोल धंगेकर यांनी केला आहे.

भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांचा जैन होस्टेल खरेदी प्रकरणातही सहभाग असून, बिल्डरला फायदा देण्यासाठी प्रकल्पांना मंजुरी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.अर्थात बिल्डर नावाला असतात हेच मालक असतात. आता हे शपथ पत्रात लीगल बिल्डर पार्टनरशिप दाखवतात तर अनधिकृत किती पार्टनरशिप असतील? असा हल्लाबोल धंगेकरांनी केला आहे.

