मोठी बातमी! म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नींनं उचललं टोकाचं पाऊल, अधिकाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा


मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात विवाहित महिलांच्या आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असतानाच मुंबईतील कांदिवलीतील आकुर्ली परिसरात म्हाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशाच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, 44 वर्षीय रेणु कटरे यांनी राहत्या घरी गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाची उपनिबंधक बापू कटरे यांच्या पत्नी रेणू आपल्या सासरच्या सोबत मुंबईतील कांदिवलीतील आकुर्ली परिसरात राहत होत्या. पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद सुरू होते.शनिवारी रात्रीही असाच काहीसा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर काही वेळातच रेणु यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर कटरे कुटुंबात हळहळ व्यक्त होत असली तरी या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. रेणु कटरे यांचे भाऊ अ‍ॅड. नितीन शेवाळ यांनी ही आत्महत्या नसून, हत्या असण्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान रेणु कटरे यांचे भाऊ नितीन शेवाळ यांनी थेट पती बापू कटरे यांच्यावर गंभीर आरोप करत, बहिणीचा छळ केल्याचे म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत अ‍ॅड. नितीन शेवाळ हे समतानगर पोलिस ठाण्यात पोहोचले असून, त्यांनी तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, समतानगर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. रेणु कटरे यांच्या मृत्यूमागील कारण नेमकं काय आहे, हे तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. मात्र, कुटुंबियांनी जो संशय व्यक्त केला आहे, त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!