मोठी बातमी! मनोज जरांगे शिवनेरीवर दाखल, मोर्चासाठी पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल.


पुणे : मराठा मोर्चाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनाचे रणशिंग फुकले आहे. यासाठी ते आज शिवनेरीवरील शिवजन्मस्थळी नतमस्तक होऊन मुंबईच्या आझाद मैदानाकडे मार्गस्थ होणार आहेत. ते किल्ले शिवनेरीवर दाखल झाले असून शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती मराठा मोर्चाचे समन्वयक संदेश बारवे यांनी दिली. या मोर्चासाठी पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा मोर्चाला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने वाहतूक मार्गात मोठे बदल केले आहेत.नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी १४ नंबर जांबूत फाटा येथून नगरकडे जाणारी वाहतूक बोरी- बेल्हे-अळकुटी-पारनेर अहिल्यानगर मार्गे वळविण्यात येईल.नारायणगाव-जुन्नर मार्गावरील वाहतूक जुन्नरकडे जाताना ओझर फाटा, कारखाना फाटा, शिरोली बुद्रुकमार्गे वाहतूक वळविण्यात येत आहे.नारायणगाव ते पुणे बाजूला जाणारी वाहतूक पुणे-नाशिक महामार्ग व बायपास महामार्गावरील नारायणगाव बाजूकडून पुणे-चाकण बाजूला जाणारी वाहने नारायणगाव बाह्यवळण येथून (अष्टविनायक मार्ग) कार फाटा, नागापूर, रोडेवाडी फाटा ते लोणी ते पाबळ मार्गे शिक्रापूर-नगर रस्ता मार्गे पुणे अशी जातील.

तसेच नारायणगाव बाजूकडून येताना बाह्यवळणाने मंचर ते निघोटवाडी मार्गे मोर्चा जाताना वाहतूक जीवनखिंड, मंचर येथून मंचर शहरात तेथून अवसरी फाटा ते जीवनखिंड ते नंदी चौकमार्गे वळविली आहे.खेड शहरातून पुणे बाजूकडे जाणारी वाहने पाबळमार्गे जातील,,दरम्यान मराठा मोर्चा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात होणारी वाहनांची आणि आंदोलनकांची गर्दी लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत होणारे सर्व लिलाव २८ ऑगस्टला बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याच पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!