Big News : गावकऱ्यांनी केलेला आग्रह जरांडे पाटलांनी केला मान्य, घेतला मोठा निर्णय…

Big News जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. रविवार पासून त्यांनी त्यांचे उपोषण तीव्र केले असून त्यांनी उपचार आणि पाणी घेणेही बंद केले आहे. त्यांची प्रकृती ढासळत आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. (Big News)

राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे. मागणी मान्य होत नसल्याने त्यांनी रविवारपासून औषध आणि पाणी त्यागल आहे. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडत चालली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना उपचार घेण्याचा आग्रह केला होता. अखेर त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी सलाईन (Big News) घेतली आहे

दरम्यान ते आज (ता.१२) सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि दुपारी दोन वाजता सर्व समाजबांधवांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य सरकारने योग्य कारण दिले तर आम्ही चार पाऊले मागे येऊ. पण सरकारला निर्णय घेण्यास वेळ का लागत आहे? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
जरांगे पाटील आग्रही आहेत. त्यांनी राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी केली आहे. या साठी त्यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे सरकार देखील सक्रिय झाले असून मराठा अरक्षणासंदर्भात त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
