मोठी बातमी! IAS तुकाराम मुंढेंची बदली, महत्त्वाच्या खात्याच्या दिली जबाबदारी, 20 वर्षात 23 वेळा बदली…


मुंबई : आपल्या धडाकेबाज कामांसाठी ओळखले जाणारे राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तुकाराम मुंढे यांची असंघटीत कामगार विभागाच्या आयुक्तपदावरून बदली करण्यात आली असून ते आता राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असतील.

गेल्या अनेक वर्षांपासून ते सतत बदलीसाठी आणि आपल्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. आता तुकाराम मुंढे यांच्यासोबत इतर चार अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे अधिकारी असून गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत त्यांची ही 23 वी बदली आहे.

तुकाराम मुंढे हे कोणत्याच राजकीय पक्षांना पचनी पडत नाहीत. मंत्र्यांना आपल्या मनाप्रमाणे नियमबाह्य गोष्टी करण्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी अडथळे ठरतात. त्यामुळे नियमानुसार सर्वसाधारणपणे तीन वर्षात बदली होणे अपेक्षित असताना तुकाराम मुंढे मात्र सरासरी एक वर्षेच काम करताना दिसून येतात.

तसेच कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय ते काम करतात. तुकाराम मुंढेंच्या कारभाराचा सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होत असला तरी राज्यकर्ते आणि प्रशासनातील मुजोर कर्मचाऱ्यांना मात्र ते नकोसे असतात. यामुळे अनेकदा वाद निर्माण होतात. अनेकदा त्यांची बदली झाल्यानंतर लोकांनी ती रद्द करण्याची मागणी केली आहे.

ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणच्या प्रशासनाला, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. सरकारी कार्यालयात उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसतो. तसेच कार्यालयातील भ्रष्टाचार देखील कमी होतो. आता त्यांची बदली झाल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!