मोठी बातमी! दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्यामागे गुजरात कनेक्शन ; काय आहे प्रकरण?

पुणे : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली होती.त्यानंतर आता या हल्ल्याचं गुजरात कनेक्शन समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता तो गुजरातचा असल्याचा उघड झाल आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजेश भाई खिमजी असं त्या आरोपीचे नाव आहे. तो गुजरातमधील राजकोटचा रहिवासी असल्याचं सांगितलं आहे. त्याचं नाव आणि पत्ता पडताळला जात आहे. त्याची कागदपत्रे देखील तपासली जात आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. यादरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या आईने राजेश कोणत्याही पक्षाशी संबंधित नसल्याच म्हटल आहे.
दरम्यान जनसुनावणीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री यांच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी माहिती दिली. जनसुनावणी सुरू असतानाच एका व्यक्तीने मुख्यमंत्री यांना काही कागदपत्रे दिली आणि नंतर अचानक त्यांचा हात पकडून त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला. या धक्काबुक्कीदरम्यान लोकांनी त्या व्यक्तीला पकडले. या घटनेमागचे कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.