मोठी बातमी ! गणेशोत्सव महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून घोषित, राज्य सरकारची मोठी घोषणा….

मुंबई : आपल्या सर्वांच्या महत्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. आता महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

यामुळे सर्व गणेशभक्तांसाठी ही एक आनंदाची बाब आहे. सध्या राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. गणेश मंडळे अनेक सामाजिक कार्य करत असतात. आता या उत्सवावर काही बंधने आली आहेत. अनेक नियम देखील आहेत.
आता महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर करावा, तसेच त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भाजप आमदार हेमंत रासणे यांनी सभागृहात केली होती. सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी त्यांनी ही मागणी केली होती. यामुळे याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्री आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा १८९३ रोजी लोकमान्य टिळकांनी सुरू केला. त्यापूर्वी घरोघरी हा उत्सव सुरु होता. महाराष्ट्र राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव हा आता आपण महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल हे आजच मी स्षप्टीकरण देतो.
सगळीकडे गणेशोत्सवाची व्यापती आणि प्रचार याबद्दल राज्य सरकार कटीबद्ध राहिल, पीओपी मूर्तींवरील निर्बंध हटवण्यात आले असून, विसर्जन परंपरागत पद्धतीनेच व्हावे, असे धोरण सरकार न्यायालयासमोर मांडत आहे. यावर लवकरच स्पष्टता येत आहे.
राज्य सरकारचे धोरण गणेशोत्सवासाठी कोणत्याही प्रकारे आडकाठीचे असणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील यावरून जोरदार टीका केली आहे.