मोठी बातमी! महाराष्ट्राचे माजी राज्यपाल राधाकृष्णन बनले देशाचे नवे उपराष्ट्रपती…


नवी दिल्ली : भाजप एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती बनले आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन विजयी झाल्याने महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आता देशाचे उपराष्ट्रपती झाले आहेत. माजी उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

त्यामुळे, उपराष्ट्रपदीपदासाठी भाजपकडून कोणाला संधी मिळणार अशी चर्चा सुरू असतानाच भाजपने नेहमीप्रमाणे नावाचे धक्कातंत्र दिले. सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दुसरीकडे महाविकास आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली होती. अखेर, आज झालेल्या मतदानानंतर राधाकृष्णन यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे.

एनडीए आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे खासदार फुटल्याचे निकालानंतर समोर आलं आहे. कारण, भाजप उमेदवार राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतदान मिळालं आहे.

       

सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाले असून त्यांना 752 वैध मतांपैकी 452 पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. त्यामुळे, 752 वैध मतांपैकी 452 पहिल्या पसंतीच्या मतांनी त्यांचा विजय झाला असून बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं पडली आहेत. या निवडणुकीत 15 मतं बाद झाली. दरम्यान, उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी निवड मंडळात 782 सदस्य असतात, त्यापैकी 543 लोकसभेचे आणि 239 राज्यसभेचे असतात.

सीपी राधाकृष्णन यांची झारखंडनंतर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. माजी राज्यपाल रमेश बैस यांच्याजागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली होती. याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु असताना राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर, महाराष्ट्रातून ते आता थेट दिल्लीच्या उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!