राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! २१०० रुपये कधी मिळणार?, महत्वाची माहिती आली समोर..


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने घोषित केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या निकालात चांगलीच गेम चेंजर ठरली. राज्यात प्रचंड लोकप्रिय झालेल्या या योजनेसाठी जवळपास अडीच कोटी महिलांनी अर्ज केले.

त्यानंतर जुलैपासून या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये देण्यास सुरुवात झाली. दरम्यान निवडणुकीत विजय झाल्यानंतर लाभार्थी महिलांना १५०० रूपये मिळणारा हफ्ता वाढवून २१०० रूपये करणार असल्याचे वक्तव्य महायुतीच्या नेत्यांनी केले होते.

दरम्यान महायुतीचं सरकार पुन्हा राज्यात आल्यानंतर २१०० रूपयांचा हफ्ता कधी याकडे साऱ्या लाडक्या बहिणींचं लक्ष लागले आहे. असताना महायुती सरकारमधील मंत्र्यानं मोठं वक्तव्य केले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचे विधान केले आहे.

मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये होणार. अर्थ संकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळतील असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात विखे पाटील यांनी हे विधान केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!