LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! सरकारच्या नव्या प्लॅनमुळे मिळणार मोठा फायदा; जाणून घ्या संपूर्ण माहिती


पुणे : देशात एलपीजी वापरासंदर्भातील नियम आणि सुविधांमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. आता कमी प्रमाणात गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसह लहान व्यावसायिकांसाठी दिलासादायक प्रस्ताव पुढे आला आहे.

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्या १० किलो वजनाच्या हलक्या कंपोझिट एलपीजी सिलेंडरचा व्यावसायिक वापरासाठी विस्तार करण्याच्या तयारीत आहेत.

सध्या बाजारात १९ किलो, ५ किलो आणि २ किलो क्षमतेचे कमर्शियल एलपीजी सिलेंडर उपलब्ध आहेत. मात्र, १९ किलोचा सिलेंडर वजनाने जड असल्याने त्याची वाहतूक आणि हाताळणी करताना अनेकांना अडचणी येतात. त्यामुळे चहाच्या टपऱ्या, फूड स्टॉल, लहान कॅफे आणि हातगाडीवरील विक्रेत्यांकडून हलक्या सिलेंडरची मागणी केली जात होती.

ही गरज लक्षात घेऊन तेल कंपन्या १० किलो क्षमतेचा कंपोझिट सिलेंडर व्यावसायिक ग्राहकांसाठी उपलब्ध करण्याचा विचार करत आहेत. याला मंजुरी मिळाल्यास कमी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना अधिक सोयीस्कर पर्याय मिळणार आहे.

हा नवीन सिलेंडर एचडीपीई आधारित आधुनिक कंपोझिट तंत्रज्ञानाने तयार करण्यात आला आहे. पारंपरिक स्टील सिलेंडरच्या तुलनेत तो जवळपास ५० टक्के हलका असल्याने त्याची वाहतूक आणि वापर अधिक सोपा होणार आहे.

या सिलेंडरचा बाहेरील भाग पारदर्शक असल्याने आत किती गॅस शिल्लक आहे, हे सहज पाहता येणार आहे. त्यामुळे वेळेवर रिफिल करण्यास मदत होईल.

सध्या हा कंपोझिट सिलेंडर काही प्रमाणात घरगुती ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. एचपीसीएलकडून तो, इंडियन ऑइलकडून ‘Indane Xtralight’ आणि बीपीसीएलकडून ‘Bharatgas Lite’ या नावाने विकला जात आहे. आता ही सुविधा व्यावसायिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे.

१० किलो कमर्शियल कंपोझिट सिलेंडरची अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, ती ५ किलो आणि १९ किलो सिलेंडरच्या किमतीच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

हा प्रस्ताव मंजूर झाल्यास लहान व्यावसायिक, स्ट्रीट फूड विक्रेते, विद्यार्थी, भाड्याच्या घरात राहणारे नागरिक आणि कमी प्रमाणात गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!