मोठी बातमी! राष्ट्रवादी शरद पवार गटातील वाद चव्हाट्यावर? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतला मोठा निर्णय..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात विधानसभा निवडणुकीनंतर नाराजीचा सूर आहे. यामुळे पक्षात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता पक्षातील अंतर्गत वाद आता उफाळून आला असल्याचे समोर आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी भाजपसोबत जात हातमिळवणी केली. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाने भाजपविरोधी भूमिका कायम ठेवली. विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा धुव्वा उडाला. त्यानंतर पक्षात नाराजीचे वातावरण असल्याच्या चर्चा होत्या. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटात अंतर्गत मोठा राजकीय घडामोड घडली आहे.
पक्षाचे सर्व प्रवक्ते आणि पदाधिकारी यांच्यावरील नियुक्त्या तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत पानिपत येथे केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेल्या शौर्य स्मारकाला विरोध करण्याची भूमिका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.
पक्षाच्या असे असताना मात्र, पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी या भूमिकेला कडाडून विरोध केला. यामुळे बैठकीतले वातावरण चांगलेच तापले होते. वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला विरोध केल्याने महेश तपासे यांना मुख्य प्रवक्तेपदावरून हटवले आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा न करता सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या गेल्या.
यामुळे या निर्णयामागे कोणत्याही एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असे वाटू नये, असे असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पक्षात नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महेश तपासे यांचे आजोबा आणि माजी राज्यपाल गणपत तपासे यांनीच पानिपत येथे पूर्वी शौर्य स्मारक उभारले होते.
त्यामुळे महेश तपासे यांनी केंद्र सरकारच्या स्मारकाला पाठिंबा दिला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षात मतभेद निर्माण झाले आणि नेत्यांच्या नाराजीला तोंड द्यावे लागले असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे आता आगामी काळात नेमकं काय घडणार? पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.