मोठी बातमी! मुंबईतील कबुतराखाना प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय ; बंदी कायमच….

मुंबई : मुंबईमध्ये कबुतर आणि कबुतरांना दिले जाणारे खाद्य हा वादाचा मुद्दा झाला आहे. मुंबई महापालिकेने आरोग्याचे आणि सार्वजनिक स्वच्छतेचे कारण देत दादर तसेच इतर ठिकाणावरचे कबूतर खाणे बंद केले आहेत. त्यानंतर आता हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलेले आहे.न्यायालयाने आपला याआधीचा निर्णय कायम ठेवला असून तुर्तास कबुतरखान्यांवरील बंदीही कायम राहणार असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे.

मुंबईत पालिकेने दादर तसेच इतर ठिकाणावरचे कबुतरखाने बंद केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा ही बंदी उठवावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. तसेच दिवसाचा ठराविक वेळ कबुतरांना खाद्य देण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली होती. आता याच मागणीसंदर्भात न्यायालयाने मोठा निर्णय देत तूर्तास बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान महालक्ष्मी रेसकोर्सवर कबुतरांना खाद्य देण्यासाठी जागा द्या, अशी मागणी काही वकिलांनी केली होती. सार्वजनिक आरोग्याला धोका न पोहोचवता आम्ही कबुतरांना खाद्य देऊ, अशीही भूमिका सरकारने न्यायालयापुढे मांडली होती. सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत अटी-शर्तींसह आम्ही कबुतरांना खाद्य द्यायला तयार आहोत, असे पालिकेने न्यायालयात सांगितले होते. मात्र आता न्यायालयाने आपला निर्णय कायम ठेवला आहे
