मोठी बातमी! ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या लेकावर गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण?


पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटाचे आमदाराला मोठा धक्का बसला आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख असलेले विक्रांत जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदेच्या युवासेनाच्या उपजिल्हा प्रमुखाला शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लोटे MIDC मधील कंपनीत बांधकामाच्या ठेक्यावरून वाद झाला आणि त्यानंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये विक्रांत जाधव आक्रमकपणे समोरील व्यक्तीच्या अंगावर धावून जात असल्याचे पाहायला मिळत आहेत.

नेमके प्रकरण काय?

       

लोटे MIDC मध्ये स्थानिकांना काम देण्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आमनेसामने आले. यावेळी विक्रांत जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सचिन काते यांना माझ्या कामगारांना काम थांबवण्यास सांगायचे नाही, असे सांगितले. तसेच, तुमचा मंत्री आहे म्हणून तुम्ही वाट्टेल ते करणार का? असा प्रश्न यावेळी विक्रांत जाधव यांनी विचारला तर, याचवेळी विक्रांत जाधवांनी काही लोकांची नावे घेत तुम्ही त्यांची कामे बंद करणार का? तुम्ही संतोष यांची फॅक्टरी बंद पाडणार का? असेही प्रश्न विक्रांत जाधव यांनी काते यांना विचारले. पण फॅक्टरी बंद करण्याचा प्रश्न येत नाही, असे कातेंनी प्रत्युत्तरात म्हटले. पण काते तुमचा आणि माझा काही संबंध नाही, तुम्ही माझ्या वादात पडू नका. तुम्ही माझ्या कामगारांना काम बंद करायला सांगायचे नाही, तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते कंपनीशी बोलायचे असे विक्रांत जाधवांनी कातेंना म्हटले. पण लेबर तुमचे असतील पण काम कंपनीचे आहे, असे सचिन काते यांनी म्हणताच विक्रांत जाधव आक्रमक झाले आणि त्यांच्या अंगावर धाऊन गेले.

याप्रकरणी सचिन काते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विजय केमिकल कंपनीत स्थानिक युवकांना रोजगार देण्याची मागणी करत असताना अचानक वाद निर्माण झाला. त्यानंतर विक्रांत जाधव, सुमित शिंदे, विवेक आंब्रे व त्यांच्यासोबत आलेल्या आणखी सात ते आठ जणांनी काते यांच्यावर हल्ला करून मारहाण केली, असे तक्रारीत नमूद आहेयाप्रकरणी खेड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, या प्रकरणामुळे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!