मोठी बातमी! नक्षलवाद्यांच्या चकमकीत २७ नक्षलवादी ठार, कोटींचे बक्षीस असलेला नक्षलवादीही मारला…


नारायणपूर : छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी २७ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. या चकमकीत एक जवान देखील शहीद झाला तर एक जखमी झाला. अबुझमद परिसरात सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. चकमकीत वसवराजूचा समावेश होता, ज्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते.

जिल्ह्यातील अबुझमद भागातील माड विभागात जिल्हा राखीव रक्षक नारायणपूर, डीआरजी दंतेवाडा, डीआरजी बिजापूर आणि डीआरजी कोंडागाव यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी रवाना करण्यात आले. २६ हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. अंतिम शोध मोहीम सुरू आहे. हे एक मोठे यश आहे. मृतदेह आणि शस्त्रास्त्रांची माहिती लवकरच दिली जाईल.

अमित शहा यांनी सांगितले की, मी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात परत येण्याची आणि चर्चा करण्याची विनंती करतो. मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनीही असेच आवाहन केले आहे. केंद्र सरकारने देशाला नक्षलमुक्त करण्यासाठी मुदत दिली आहे. नक्षलवाद्यांवर सतत कारवाई केली जात आहे.

दरम्यान, अलीकडे छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टालूच्या डोंगरात नक्षलवाद्यांवर २१ दिवस कारवाई करण्यात आली. दरम्यान, ही एक मोठी बातमी असून या कारवाईमुळे अनेक नक्षलीतळ उध्वस्त करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!