मोठी बातमी! ‘या’ लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर जमा होणार 10 हजार रुपये ; काय आहे योजना?

पुणे : निवडणूक आली की सत्ताधारी पक्ष वेगवेगळ्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या योजनांची घोषणा करतात. सध्या अशाच एका योजनेची चर्चा होत आहे. केंद्र सरकारकडून लाडक्या बहिणींना म्हणजेच महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले जाणार आहेत.बिहार सरकारकडून ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ सुरू केली जात आहे.या योजनेतून महिलांच्या बँक खात्यावर दहा हजार रुपये रक्कम जमा केली जाणार आहे.

या योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील पात्र महिलेच्या बँक खात्यात तब्बल 10 हजार रुपये पाठवले जाणार आहेत. मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ करताच 75 लाख महिलांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हे पैसे पाठवले जाणार आहेत. त्यामुळे आता या योजनेची देशभरात चर्चा होणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
ही योजना बिहारमधील महिला आर्थिक दृष्टीकोनातून सशक्त आणि स्वावलंबी व्हाव्यात यासाठीच ही महत्त्वाकांक्षी योजना चालू केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बिहारच्या प्रत्येक कुटुंबातील एका पात्र महिलेच्या बँक खात्यात 10 हजार रुपये पाठवले जाणार आहेत.

योजनेची अट काय?
या योजनेसाठी महिलांना अर्ज करावा लागणार आहे. अर्जाची प्रक्रिया सोपी ठेवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. त्यानंतर प्रत्येक कुटुंबातील एका पात्र महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल. याच योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना सहा महिन्यांनी 2 लाख रुपयांपर्यत आर्थिक मदत दिली जाणार आहे.