सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, पुण्यातील भाव काय आहेत, जाणून घ्या…


पुणे : सोन्या आणि चांदीच्या किमती मागच्या काही दिवसांपासून सतत वाढताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात सोन्याचे दर घसरले होते पण जुलै महिन्यात सोने-चांदीचे दर वधारले.

आज सोने आणि चांदीच्या दरात साधारण वाढ झाली आहे. आज (ता. ५) रोजी २२ कॅरेट सोन्याचा दर५४,५०५ रुपये प्रति १० ग्रॅम वर आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ५९,४६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,३१० रुपये होती.

दरम्यान, आज शनिवार ता.५ पुण्यामध्ये सोन्याची किंमत २४ कॅरेट साठी ५९,४६० रुपये (प्रति १० ग्रॅम) आहे. तसेच २२ कॅरेट साठी ५४,५०५ रुपये मोजावे लागणार आहे. त्याचबरोबर आज बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार चांदी ७२,५९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,३७० रुपये प्रति किलो होती.

आजचा सोन्याचा भाव –

पुणे – २२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) – ५४,५०५ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) – ५९,४६० रुपये

मुंबई – २२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) – ५४,५०५रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) – ५९,४६० रूपये

नागपूर – २२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १०ग्रॅम) – ५४,५०५ रूपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) – ५९,४६० रुपये

नाशिक – २२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) – ५४,५०५ रूपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) – ५९,४६० रुपये

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!