राज्य सरकारचा मोठा निर्णय!! पंढरपूर वारीदरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला 4 लाखांची आर्थिक मदत मिळणार..


पंढरपूर : यंदा महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये वारीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या अपघातात वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. वारीच्या कालावधीत वारीदरम्यान जर एखाद्या वारकऱ्याचा अपघात, विषबाधा किंवा इतर नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबीयांना ही रक्कम दिली जाणार आहे.

तसेच वारीदरम्यान अपघातामुळे अपंगत्व आल्यास देखील आर्थिक मदतीची तरतूद आहे. या निर्णयामुळे वारीदरम्यान घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमध्ये वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळणार आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरता वारी सुरू झाल्याच्या दिनांक पासून अपघाताने किंवा दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तसेच जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी मदतीची तरतूद करण्यात आली आहे.

यामध्ये आता नियमानुसार अपघाताने व दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारांस 4 लाखांची मदत केली जाणार आहे. यामध्ये वारीदरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना 40 ते 60 टक्के अपंगत्व आल्यास 74,000 तसेच 60 टक्क्यांवरून अधिक अपंगत्व आल्यास 2.50 लाखएका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पीतळात दाखल झाल्यास 16000 रुपये दिले जाणार आहेत.

तसेच एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी दाखल असल्यास 5400 रुपयांची मदत केली जाणार आहे. दरम्यान, वारीमध्ये सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी त्याना दिले. याठिकाणी मोठी गर्दी होणार आहे.

तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. याहीवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, असेही सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!