बड्या बॉलीवूड अभिनेत्याने घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट, मुलाला थेट मिठीच मारली…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. धनंजय देशमुख यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मीक कराड आणि त्याच्या गँगने संतोष देशमुख यांचा अमानुष छळ करत निर्घृण हत्या केली आहे.
या घटनेनंतर अभिनेता आमिर खानने संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मुलगा विराजला मिठी मारत आमिरने त्यांना भावनिक आधार दिला आहे. भेटीचा बोलका फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाणी फाऊंडेशनच्या एका कार्यक्रमादरम्यान अभिनेता आमिर खान याने बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली. या भेटीवेळी संतोष देशमुख यांचा अल्पवयीन मुलगा विराजही उपस्थित होता.
आमिरने त्याला मिठी मारत धीर दिला, आणि कुटुंबियांच्या भावना जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान आमिरसोबत त्याची एक्स पत्नी किरण राव देखील उपस्थित होती. या क्षणांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात आमिर कुटुंबियांसोबत संवाद साधताना दिसतो.