ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, ९ पैकी ६ खासदार ‘जय महाराष्ट्र’ करणार? मोठी नावी आली समोर..


मुंबई : उद्धव ठाकरे यांना जोरदार हादरा बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाकरे गटातील एक-दोन नव्हे, तर तब्बल सहा खासदार पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याचं बोललं जात आहे.

पक्षांतरबंदी कायद्याला हुलकावणी देण्यासाठी आवश्यक असलेली सहा खासदारांची मोट बांधण्यात शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आल्याचे चित्र आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर अडीच वर्षांनी पुन्हा एकदा पक्षात राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत.

ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या साथीला येणार असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन धनुष्यबाण राबवलं जाण्याची चर्चा होती.

शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही आठवड्यांपूर्वीच ठाकरेंना पुन्हा हादरा बसण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार लवकरच लोकसभेतील ठाकरेंच्या सहा शिलेदारांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!