शरद पवारांना मोठा धक्का; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकापूर्वी पक्षाने साथ सोडली…


पुणे : नुकताच नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीच्या काळात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेसने दिला आहे. धाराशिव मधील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना दोन वेळा तुळजापूर विधानसभा लढविलेले अशोक जगदाळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जगदाळे यांच्या या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नळदुर्ग नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणार असल्याचा निर्धारही जगदाळे यांनी बोलून दाखवला आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना हा धक्का मानला जात आहे.दरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश करताच अशोक जगदाळे यांनी, नळदुर्ग नगरपालिका निवडणूक भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार असं जाहीर केलय. काँग्रेस नगराध्यक्ष पदासह 18 जागा तर शिवसेना उबाठा आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 1 जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान दोन-तीन दिवसांपूर्वी सोलापुरात भाजपने राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला होता. सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाच माजी नगरसेकांनी भाजपत प्रवेश केला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेपूर्वी ही मोठी खेळी आहे. त्यामुळे आता शरद पवार भाकरी फिरवणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!