आधी गाण्याचं शूट, पुण्यातील २८ वर्षीय अभिनेत्रीवर रिकाम्या फ्लॅटमध्ये अत्याचार, घटनेने खळबळ..


पुणे : आयटी कंपनीत काम करणाऱ्या २८ वर्षीय अभिनेत्री तरुणीला गाण्यांच्या अल्बममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कराड येथे नेऊन बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी विशाल दीपक (रा. कराड, जि. सातारा) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदननगर पोलिसांनी हा गुन्हा ‘झिरो एफआयआर’ने कराड पोलिसांकडे वर्ग केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित तरुणी मूळची परराज्यातील असून, सध्या पुण्यात आयटी कंपनीत कार्यरत आहे. तिला अभिनयाची आवड असल्याने तिने ‘ओम तेजा प्रॉडक्शन’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन केला होता. या ग्रुपमध्ये विशालने शॉर्ट फिल्मसाठी मुलगी हवी असल्याची पोस्ट टाकली होती.

त्यानंतर त्याने तरुणीशी संपर्क साधून ‘अल्बम साँगसाठी शूटिंग आहे’ असे सांगून कराडला बोलावले. तरुणी ठरल्याप्रमाणे जूनमध्ये कराडला गेली. विशालने बस स्थानकातून तिला स्वतःच्या घरी नेले. दोन दिवस सलग विविध घाटांवर अल्बमचे शूटिंग झाले. मात्र, तिसऱ्या दिवशी विशालने तिला एका रिकाम्या फ्लॅटवर नेले आणि बलात्कार केला, असे तक्रारीत नोंद आहे.

दरम्यान, घटनेनंतर तरुणीला पुण्यात पाठवले. त्यानंतर विशाल फोनवर संपर्क साधत राहिला. ‘लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू या’ असा आग्रह त्याने धरला. तरुणीने नकार दिल्यावर त्याने पाठलागही केला. हा प्रकार सात जून २०२५ ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यान पुणे व कराड येथे घडल्याने चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!