२५ मेपासून पुढचे ९ दिवस सावध रहा! ‘या’ ४ राशींना मोठा धोका, नौतप काळ ठरू शकतो त्रासदायक

नवी दिल्ली : हिंदू पंचांगानुसार वर्षातील सर्वाधिक उष्ण मानला जाणारा ‘नौतप’ काळ २५ मे २०२६ पासून सुरू होत आहे. सूर्यदेव कृत्तिका नक्षत्रातून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतात, त्या नंतरचे पहिले ९ दिवस ‘नौतप’ म्हणून ओळखले जातात. या काळात उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढते.

ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाचा नौतप काही राशींसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः वृषभ, मिथुन, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी या काळात अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
वृषभ राशी
या काळात स्वभावात चिडचिड, राग आणि अहंकार वाढू शकतो. घरगुती वातावरण बिघडण्याची शक्यता असून व्यावसायिक भागीदारांसोबत वाद निर्माण होऊ शकतात. बोलताना संयम राखणे गरजेचे ठरणार आहे.

मिथुन राशी
आर्थिक बाबतीत हा काळ तणावाचा ठरू शकतो. घरगुती किंवा आरोग्याशी संबंधित खर्च अचानक वाढू शकतात. उत्पन्न मर्यादित राहिल्याने आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. गुंतवणूक आणि पैशांची देवाणघेवाण करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

वृश्चिक राशी
नातेसंबंध आणि भागीदारीच्या बाबतीत तणाव वाढू शकतो. जोडीदारासोबत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असून भागीदारीतील व्यवसायात नुकसान होण्याचे संकेत आहेत. महत्त्वाचे निर्णय शांतपणे घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
कुंभ राशी
घरगुती वाद आणि आरोग्याच्या समस्या या काळात त्रासदायक ठरू शकतात. मालमत्तेशी संबंधित वाद निर्माण होण्याची शक्यता असून उन्हामुळे प्रकृती बिघडू शकते. आईच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, नौतप काळात संयम, आरोग्याची काळजी आणि विचारपूर्वक निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.