बारामती खरंच जिल्हा होणार? बातमी खरी की फक्त वावड्या? बारामतीत येताच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितली खरी माहिती….


बारामती : राज्यात सध्या सोशल मीडियावर एक बातमी पसरत आहे. 26 जानेवारीला राज्यामध्ये अनेक जिल्हे होणार असून यामध्ये बारामतीचा देखील समावेश आहे. अशी ही बातमी आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातही तीन जिल्हे होणार असल्याच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

यावर आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक वक्तव्य केले आहे. बारामतीत विमानतळावर आलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा देखील त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या वावड्या कोण उठवत आहेत तेच कळत नाही, असं म्हणत त्यांनी पूर्ण विराम दिला.

ते म्हणाले, अशा प्रकारचा जिल्ह्यांचा कोणताही प्रस्ताव शासनाकडे नाही. मी अनेक वर्ष महसूल मंत्री म्हणून काम केले आहे. सरकारपुढे असा कोणताही प्रस्ताव नाही, ना त्या प्रस्तावाची कुठे चर्चा आहे. ना जिल्हा अंमलबजावणीची चर्चा आहे. असे म्हणत त्यांनी हा विषय खरा नसल्याचे सांगितले.

या सर्व बातम्या कपोलकल्पित आहेत. याला काहीही अर्थ नाही असे ते म्हणाले. यामुळे आता या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत बारामती जिल्हा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे मात्र याची जोरदार चर्चा सगळीकडे सुरू झाली होती.

या अफवेमुळे जमिनीच्या किमती वाढल्या. अनेकांनी बारामती जिल्हा होणार असल्याचे सांगून जमिनीच्या किमती वाढवल्या. मात्र याबाबत कोणताही प्रस्ताव राज्य सरकारकडे आला नाही, या केवळ अफवा असल्याचे समोर आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून 26 जानेवारीला राज्यामध्ये अनेक जिल्हे होणार असून यामध्ये बारामतीचा देखील समावेश आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातही तीन जिल्हे होणार असल्याच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर वायरल होत आहेत. इतर ठिकाणी देखील जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याची चर्चा मात्र सगळीकडे सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!