Baramati News : सोशल मीडियावर हत्यारं दाखवली, मग काय बारामती पोलिसांनी हिसकाच दाखवला, तिघे जेलबंद…
Baramati News बारामती : स्टेटस वर कोयता आणि रिव्हॉल्व्हर दाखवलेल्या तिघा जणांना बारामती तालुका पोलिसांनी आचारसंहिता काळात अग्निशस्त्र व धारदार कोयता बाळगल्याप्रकरणी जेरबंद केले आहे.
रोहित वनवे तांदूळवाडी येथील सागर भिंगारदिवे व सावळे येथील आकाश शेंडे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
निवडणुक आचारसंहिता काळात बारामती शहर व तालुक्यातील सोशल मीडिया अकाउंट वर लक्ष ठेवून त्यांचे मॉनिटरिंग करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले आहेत त्यानुसार सध्या तालुक्यातील सोशल मीडियाच्या अकाउंटवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे.
बारामती तालुका पोलीस ठाण्याचे फौजदार राजेश माळी यांना मिळालेल्या माहितीनुसार सावळ येथील आकाश शेंडे याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर धारदार कोयता दाखवला.
त्यामुळे माळी यांनी आकाश शेंडे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी धारदार कोयता जप्त केला. पण त्याच्या मोबाईलची पाहणी केल्यानंतर त्या मोबाईल मध्ये त्याच्याकडे रिव्हॉल्व्हरचे फोटो दिसून आले. त्यावरून त्याच्याकडे तपास केला, तेव्हा त्याने सदरचे रिव्हॉल्व्हर लाकडी येथील त्याचा साथीदार रोहित वणवे याच्याकडे असल्याचे सांगितले.
रोहित वणवे यास पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्याची पंचासमक्ष अंग झडती घेतली असता, त्याच्या ताब्यात एक सिल्व्हर रंगाचे अग्निशस्त्र व एक मोकळी पुंगळी आढळून आली.
वणवे यास अग्निशस्त्रबाबत विचारपूस केली तेव्हा त्याने सदरचे अग्निशस्त्र हे सागर भिंगारदिवे (रा तांदुळवाडी) याच्याकडून दोन महिन्यापूर्वी विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस पथकाने भिंगारदिवे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे पिस्टल बाबत तपास करता ओंकार महाडीक याचेकडून घेतल्याचे सांगितले. Baramati News
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आकाश शेंडे, रोहित वणवे व सागर भिंगारदिवे या तिघांना अटक केली आहे. दरम्यान निवडणुकीच्या काळात पोलिसांचे दैनंदिन सोशल मीडिया मॉनिटरिंग अशाच प्रकारे चालू राहणार आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.