बारामतीत हिंदू संघटना एकवटल्या, लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधात आज मोर्चा…!


बारामती : बारामतीमध्ये आज भगवे वादळ दिसणार आहे. राज्यभरात वेगवेगळे हिंदूत्ववादी कायदे करण्यासाठी सरकारविरोधात हिंदूत्ववादी संघटनांचा मोर्चा सुरू आहे. यासाठी बारामतीमध्ये हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

याअंतर्गत हिंदूत्ववादी संघटनांनी राज्यभरात लव्ह जिहाद, धर्मांतरण विरोधात कायदे करण्यासाठी हिंदू जनजागरण मोर्चे सुरू केले आहेत. यामधून एक इशारा देण्यात येणार आहे.

दरम्यान, आज बारामतीत हा मोर्चा होणार आहे. बारामती शहरात विविध ठिकाणी भगव्या झेंड्यांनी वातावरण भगवे करून टाकले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या मोर्चासाठी कालिचरण महाराज शरद गायकर उपस्थित राहणार आहेत. ही जनगर्जना छत्रपती शिवाजीमहाराजांचे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठीच सुरू असल्याचा दावा कालिचरण महाराज यांनी केला आहे.दुपारी हा मोर्चा कसबा येथून सुरू होणार आहे. तसेच शहरातील तीन हत्ती चौकात जाहीर सभा होणार आहे. या मोर्चासाठी गेल्या काही दिवसांपासून सकल हिंदू समाजाच्या वतीने जनजागृती सुरू होती. यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकं उपस्थित राहणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!