Baramati Crime : फुकट अंडी दिली नाहीत म्हणून भुर्जी विक्रेत्याचा खून, बारामतीमधील धक्कादायक घटना..


Baramati Crime बारामती : फुकट अंडी न दिल्याच्या कारणावरून अंडा भुर्जी विक्रेत्याचा मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. Baramati Crime

प्रवीण भानुदास मोरे (वय ३६ रा. कल्याणी नगर तांदुळवाडी ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शाहबाज रौफ पठाण (वय ३२ वर्षे रा.सद्गुरु नगर पाटस रोड ता. बारामती) असे हत्या करण्यात आलेल्या अंडा भुर्जी विक्री करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. 

मिळालेल्या माहिती नुसार, शाहबाज हा रात्रीच्या वेळी अंडा भुर्जी गाडी लावून विक्री करीत होता. त्याला अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने गंभीर जखमी केले होते. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करणेत आला होता. जखमीवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना रविवारी( ता.८) त्याचा मृत्यू झाला. Baramati Crime

पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी गुन्हा दाखल झाल्या नंतर यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी ४ पोलीस पथक तयार केले होते. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार दशरथ इंगोले व अक्षय सिताप यांनी तांत्रिक विश्लेषण तसेच गुन्हा घडले ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यावेळी शहाबाज पठाण यास दारूचे नशेत फुकट अंडी देण्याबाबत एकाने वाद घातल्याची माहिती मिळाली होती.

त्याप्रमाणे माहिती काढून प्रवीण मोरे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली. यावेळी त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने बारामती शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!