Baramati : पवार साहेबांसाठी कायपण! तुतारीच्या प्रचारासाठी भाऊने तयार केली चक्क चांदीची टोपी…


Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे .

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून देशासह महाराष्ट्रातही प्रचाराची धूम आहे. वेगवेगळे पक्ष पूर्ण ताकदीने आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. या प्रचारमोहिमेत कार्यकर्तेदेखील मागे नाहीत. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेणे, आपल्या नेत्यासाच्या वेगवेगळ्या गोष्टींचे नियोजन करणे अशी जमेल ती कामे हे कार्यकर्ते करत आहेत.

अशाच शरद पवार यांच्या एका खंद्या कार्यकर्त्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. त्याने शरद पवार यांच्या पक्षाचे चिन्ह सर्व लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी चक्क चांदीची टोपी तयार केली आहे. Baramati

गणेश नवले असे शरद पवार यांच्या या कार्यकर्त्याचे नाव आहे. ते मुळचे बारामतीचे रहिवासी आहेत. नवले यांनी तयार केलेली टोपी साधीसुधी नाही. ती चांगलीच मोठी आहे. विशेष म्हणजे तिला डोक्यावर घालता येते.

या टोपीच्या एका बाजूला पवार साहेब आणि दुसऱ्या बाजूला ताईसाहेब असे लिहिलेले आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी हे चिन्हदेखील या टोपीवर कोरण्यात आले आहे. नवले ही टोपी डोक्यावर घालून सुप्रिया सुळेंचा प्रचार करत आहेत.

दरम्यान, बारामती मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाकूडन सुप्रिया सुळे निवडणूक लढवणार आहेत. तर महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार आहे. या जागेवर नणंद विरुद्ध भावजई अशी लढत होणार आहे. त्यामुळे या जागेची सध्या सगळीकडे चर्चा असून विजयासाठी दोन्ही बाजूने चांगलाच जोर लावला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!