Baramati : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का, निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस, नेमकं काय घडलं?
Baramati : बारामती मतदारसंघात सध्या मोठी लढत बघायला मिळत आहे. याठिकाणी पवार कुटूंबातच सामना आहे. या मतदासंघात नणंद विरुद्ध भावजय असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीत कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
असे असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. आता निवडणूक आयोगाने पाठवल्या एका नोटीसमुळे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या दोन्ही नेत्यांना निवडणूक आयोगने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.
खर्च कमी दाखवला असून खर्चात तफावत आढळून आल्याने ही नोटीस बजावली आहे. दोन्ही उमेदवारांना ४८ तासात खुलासा करण्याचे देखील सांगितले आहे. यामुळे आता याला नेमकं काय उत्तर दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी उमेदवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावली आहे. Baramati
याबाबत माहिती अशी की, सुप्रिया सुळे यांच्या खर्चात १ लाख ३ हजार रुपयाची तफावत आढळली आहे. त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या तपासणीत निवडणूक खर्चात ९ लाख १० हजाराची तफावत आढळून आली आहे.
यामुळे याबाबत खुलासा निवडणूक आयोगाने मागवला आहे. आता निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर याला दोन्ही उमेदवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत सध्या प्रक्रिया सुरु झाली आहे.