Baramati : बारामतीत राडा! शिंदे गट – राष्ट्रवादी आमनेसामने, अजित पवार यांच्या फोटोला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातला दुग्धाभिषेक, नेमकं काय घडलं?

Baramati : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर उमेदवारीसाठी ज्याठिकाणी सोयीचे ठरेल त्या पक्षात इच्छुक पक्षांतर करताना दिसत आहेत.अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र देवरे यांनी बारामतीतील शारदा प्रांगणामध्ये एकनाथ गणेशोत्सव साजरा केलेला आहे.
या गणेशोत्सवाच्या मंडपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचेही फोटो त्यांनी लावले होते. अजित पवार यांनी बारामतीत सगळ्या गणेशोत्सवांना भेटी दिल्या. आपल्या गणेशोत्सवाला भेट दिली नाही म्हणून सुरेंद्र देवरे यांनी त्यांच्या फोटोला काळे कापड लावले. Baramati
या घटनेनंतर तणाव वाढताच पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतले. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाकडून अजित पवार यांचे बॅनर, काळे कापड कडण्यात आले काढण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या फोटोचां दुग्धाभिषेक केला. व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.