फुगा फुगवताना तोंडातच फुटला, चिमुकलीने काही क्षणातच जीव गमावला, कुटूंबाला बसला मोठा धक्का…


धुळे : धुळ्यातील यशवंत नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे फुगा फुगवताना अचानकच तोंडातच तो फुटला. रबरी फुगा तोंडात फुटल्यानं त्या फुग्याचे तुकडे श्वासनलिकेत अडकल्याने आठ वर्षांच्या चिमूकलीला जीव गमवावा लागला आहे. यामुळे कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. अंगणात खेळत असताना या 8 वर्षीय चिमुकलीचा दु्र्दैवी अंत झाला.

एक फुगा चिमुकली डिंपलचे प्राण घेण्यास कारणीभूत ठरला. अंगणात खेळत असताना फुगा फुगवताना तोंडातच फुटला. त्यानंतर श्वास अडकून डिंपल वानखेडे या 8 वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने वानखेडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झाला.

डिंपलच्या दुर्देवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्वास घेण्यास त्रास होतोय हे लक्षात येताच घरच्यांनी तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी मुलीस तपासून मृत घोषित केले. आठ वर्षीय डिंपल आपल्या अंगणात खेळत असताना फुगा फुगवताना झालेल्या या दुर्घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे एक फुगा चिमुकली डिंपलचे प्राण घेण्यास कारणीभूत ठरला असल्याची माहिती समोर आली. हसत खेळत असलेली मुलगी अचानक या घटनेत मृत्युमुखी पडल्याने कुटूंबाला मोठा धक्का बसला असून शोक व्यक्त केला जात आहे. याबाबत घरात अशा प्रकारे घटना वाढत असल्याने बारीक मुलांबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!