Bageshwar Baba : मराठ्यांना आरक्षण द्यावं का? आता बागेश्वर बाबांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Bageshwar Baba : राज्यभरात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले आहे. अशातच आता बागेश्वर धाम बाबा यांनी मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची टिप्पणी केली आहे. बागेश्वर बाबा त्यांच्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत आहेत. यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे.
छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सोमवारी रामकथेचे वाचन करण्याच्या कार्यक्रमासाठी बागेश्वर बाबा उपस्थित होते . यावेळी बागेश्वर बाबांना पत्रकारांनी तुम्ही मन की बात करण्यासाठी प्रसिद्ध आहात. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मागील काही काळापासून जोरदार मागणी चालू आहे. Bageshwar Baba
त्यामुळे तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे का? असा प्रश्न पत्रकारांनी बागेश्वर बाबा यांना विचारला. यानंतर या प्रश्नावर बागेश्वर बाबा यांनी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर देत आपली भूमिका मांडली आहे.
बागेश्वर बाबांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला थेट पाठिंबा दिला आहे. एवढेच नाही तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मराठ्यांचा सर्वात मोठा वाटा असल्याच देखील त्यांनी म्हटल आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, मन की बात करणं वेगळी गोष्ट आहे आणि अधिकाराबद्दल बोलण वेगळी गोष्ट आहे. मात्र मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे असं बागेश्वर बाबा म्हणाले आहेत.
बागेश्वर बाबा म्हणाले की, मला मनातील गोष्ट वाचता येणे हा एक वेगळा विषय आहे. अधिकारांची गोष्ट करणे, हा एक वेगळा विषय आहे. भारत जेव्हा संकटात होता, तेव्हा आपल्या शौर्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या जमातीला आरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सरकारने त्यांच्याशी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे मत बागेश्वर धाम बाबा यांनी व्यक्त केले.