Bacchu Kadu : वादग्रस्त वक्तव्यानंतर आता आमदार बच्चू कडू यांचा माफीनामा, म्हणाले, आंडू पांडू…


Bacchu Kadu जळगाव : प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात बोलताना आमदार बच्चू कडू यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. जळगावात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ‘हिजडे सुद्धा आमदार होतात’, असे वादग्रस्त वक्तव्य बच्चू कडू यांनी केले होते. (Bacchu Kadu)

त्यावरून त्यांच्यावर विरोधकांनी चांगलाच निशाणा साधला आहे. आपली चूक लक्षात येताच बच्चू कडूंनी माफी मागितली आहे. त्यानंतर त्यांनी चुकीची कबुली देत आपल्याला आंडू-पांडू लोकही आमदार होतात, असे म्हणायचे होते असे स्पष्ट करत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

बच्चू कडू म्हणाले की, मी आमदार होणार की नाही याची मला पर्वा नाही. मात्र, शेतकऱ्याची पर्वा असणारा प्रहार पक्ष आहे, असं ते म्हणाले. ज्याच्या बोलण्यात दम नसतो. त्याच्या ओठावर मिशी नाही, दाढी नाही. चालतो तेव्हा बाई आहे की माणूस ते सुद्धा कळत नाही, असेही लोक आमदार होतात.

हिजडेसुद्धा आमदार होतात, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. त्यांचा हा रोख कोणाच्या दिशेने होता हे कळताच उपस्थित कार्यकर्त्यांना हसू आवरले नाही. मात्र, आमदार बच्चू कडू यांनी लगेचच त्या शब्दाबद्दल माफीही मागितली. आंडू… पांडू आमदार होतात, असा माझ्या बोलण्याचा उद्देश होता , असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!