पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा पर्दाफाश, ‘त्या’ कार्यकर्त्यांनी डेमोच दाखवला….!
![](https://thetime2time.com/wp-content/uploads/2023/04/pic-1.jpg)
हिंगोली : राज्यात सध्या पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाची चर्चा सुरु आहे. त्या बाबाचा हिंगोली जिल्हा अंनिस कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला आहे. यामुळे या बाबांचे पितळ उघडे पडले आहे. कोणत्याही तंत्र मंत्राशिवाय बाबसारखंच त्यांनीही पाण्यावर तरंगून दाखवत बाबाला उघडं पाडल आहे.
सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा करत पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा हिंगोलीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला आहे. याचे विडिओ फ़ोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी धोत्रा गावामध्ये पोहोचले. या बाबासोबत चर्चा केल्यानंतर अंनिस कार्यकर्ते व पोलीस अधिकाऱ्यांनी धोत्रा शिवारातील विहीर गाठली. या विहिरीमध्ये हरी महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी प्रकाश मगरे या दोघांनीही विहिरीत उड्या टाकल्या.
विहिरीमध्ये महाराजांप्रमाणेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी देखील पाण्यावर तरंगत असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी देखील हा चमत्कार नसून सराव केल्याने कुणालाही पाण्यांवर तरंगता येणं शक्य आहे, असे सांगितले.
त्यामुळे या बाबाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधिकारी व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. या घटनेनंतर बाबांनी घुमजाव देखील केला.