Ayodhya Ram Mandir : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी दिग्गज लावणार हजेरी, ३ हजार व्हीव्हीआयपींना निमंत्रण, कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू…
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरात २२ जानेवारीला रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा असून यासाठी एकूण ७ हजार जणांना निमंत्रणे पाठवली जात असल्याची माहिती आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह ३ हजार व्हीव्हीआयपींची नावे आहेत.
मेगास्टार अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अभिनेत्री कंगना राणावत, अक्षय कुमार, गायिका आशा भोसले यांचीही नावे या यादीत आहेत. देशभरातील ४ हजार संत-माहात्म्यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. Ayodhya Ram Mandir
दरम्यान, पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित व्यक्तींनाही आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या स्वाक्षरीनिशी या निमंत्रणपत्रिका रवाना झाल्या आहेत. व्हीव्हीआयपींना बारकोड पासद्वारे प्रवेश मिळणार आहे.