Ayodhya Ram Mandir : आयोध्येतील राम मंदिराच्या पुजाऱ्याची झाली निवड! इतक्या स्पर्धकांतून कशी झाली निवड….!!

Ayodhya Ram Mandir अयोध्या : राममंदिर उभारण्याची प्रतिक्षा आता समिप आली आहे. २२ जानेवारीला प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरात निमंत्रण पत्रिकांचे वाटप सुरू आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे लोकार्पण होत आहे. आयोध्येत राम मंदिर तयार होत असल्याने या मंदिराचा पुजारी कोन म्हणून चर्चा सुरू होती. या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. गाझियाबादमधील विद्यार्थी मोहित पांडेला अयोध्या राम मंदिरातील पुजारी म्हणून निवडण्यात आले आहे . Ayodhya Ram Mandir
मोहित पांडेनं दूधेश्वर वेद विद्यापीठात ७ वर्षे अभ्यास केला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो तिरुपतीला गेला. मंदिराचे पुजारी निवडण्यासाठी ३ हजार जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून ५० जणांची निवड करण्यात आली आहे. नियुक्तीआधी त्यांना ६ महिने प्रशिक्षण देण्यात येईल. राम मंदिरात पुजारी म्हणून मोहितची निवड झाल्याबद्दल दूधेश्वर नाथ मंदिराचे महंत नारायण गिरी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
मोहित पांडे यांनी शिक्षण घेतलेले दूधेश्वर विद्यापीठ हे गाझियाबादमधील आहे. या ठिकाणी दूधेश्वरनाथ नावाचे मंदिर प्रसिद्ध आहे. देशविदेशातून इथे भाविक येतात दूधेश्वर वेद विद्यापीठात शिकलेले विद्यार्थी पुढे देश परदेशातील मंदिरांमध्ये आचार्य म्हणून सेवा देतात.
मोहित पांडेने आधी सामवेदाचा अभ्यास केला. त्यानंतर व्यंकटेश्वर वैदिक विद्यापीठात शिक्षण घेतलं. आचार्य म्हणून शिक्षण घेतल्यानंतर मोहित पांडे आता पीएचडीची तयारी करत आहे. मोहितनं दूधेश्वर वेद विद्यापीठात सात वर्षे धर्म आणि कर्मकांडाचं शिक्षण घेतलं आहे.